ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
राजरत्न आंबेडकर यांनी घेतली पीडित कुटुंबाची रुग्णालयात भेट
March 16, 2020 • प्रजासत्ताक जनता

राजरत्न आंबेडकर यांनी घेतली पीडित कुटुंबाची रुग्णालयात भेट

औरंगाबाद:- 
भारतात ब्राह्मणांनी “कोरोना व्हायरस” पेक्षा भयंकर भयानक रोग पसरविला आहे. ऑनर किलिंगची घटना महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये घडली. माळी समाजातील मुलगी व बौद्ध समाजाचा मुलगा 12 मार्चपासून बेपत्ता होते. मुलीच्या वडिलांनी मुलाचे वडील बाळासाहेब गायकवाड यांना धमकावले की, जर मुलगी सकाळपर्यंत घरी आली नाही तर संपूर्ण कुटुंबाचे तुकडे होतील. गांभीर्य पाहून बाळासाहेब गायकवाड यांनी Dy. S.P. यांना सुरक्षा पुरविण्याची विनंती केली संरक्षण देण्याऐवजी त्यांनी त्यांनाच सुनावले आणि त्याच रात्री साडेदहाच्या सुमारास, जेव्हा नवरा बायको आपल्या घराबाहेर बसले होते. त्या क्षणी मुलीच्या कुटुंबीयांनी, वडिलांनी आणि भावाने वडिलांनी बाळासाहेब गायकवाड यांच्यावर तलवारीने हल्ला केला. हा हल्ला टाळण्यासाठी त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचा हात कापला. आईबद्दलही असेच झाले. दोघांनीही आपला जीव वाचविला आणि शेतात पळून गेले. परंतु त्यांचा दुसरा मुलगा घरातच झोपला होता, जे बाहेरील घटना घडत होती ह्या गोष्टीविषयी बेभान होता. भीमराजचा बारवी वर्गाचा एकच पेपर उरला होता. तो हल्लेखोरांच्या हातात भेटला, त्यांनी तलवारीने त्याचे मान कापली
 बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कडून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी रुग्णालयात जाऊन प्रत्यक्षात राजरत्न आंबेडकर यांनी १९ मार्च रोजी भेट घेतली. माहित नाही हा विषाणू ब्राह्मणांनी पसरवला आणि किती जणांचा बळी जाईल?  त्यात फक्त एकच अँटी व्हायरस आहे तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म. असे वक्तव्य बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केले.

 

 

 

 

 

पुन्हा एकदा खैरलांजी..... औरंगाबादमध्ये संपूर्ण कुटुंबावर हल्ला (16/3/2020)

औरंगाबाद

लाख ता. वैजापुर जि. औरगांबाद येथे सैराट प्रकरणात मुलाच्या कुटुबांवर मुलीच्या कुटुबांकडुन १४ मार्च रोजी रात्री शस्रासहीत १०ते १५ अरोपीनी केला हमला कुराडीने बौध्द मुलाच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात लहान भाऊ भिमराव बाळासाहेब गायकवाड़ याचा मृत्यू झाला. तसेच मुलाचे वडील बाळासाहेब  व आई अलका  गभीर जखमी झाले आहेत. घाटी दवाखान्यात ते  मुत्युशी झुजं देत आहेत.

या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती बौध्द समाजाचा असल्याने लाख गावात वैजापुर तालुक्यात औरंगाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात या घटनेमुळे तीव्र पडसात ऊमटत आहे. खैरलाजी सारखाच प्रकार लाख ता वैजापुर या गावातील गायकवाड़ कुटुंबासोबत घडला आहे. 

शेजारच्या वस्तीवर राहणाऱ्या एका तरुणाने मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून तरुणीचे वडील आणि चुलत्याने त्याच्या कुटुंबियांवर हल्ला केला. यात तरुणाच्या अल्पवयीन धाकट्या भावाचं तलवारीनं मुंडकं धडापासून वेगळे करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. भीमराज बाळासाहेब गायकवाड (वय-17) असे मृत तरुणाचं नाव आहे. या हल्ल्यात भीमराज याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन्ही आरोपींनी अटक केली आहे. बाळासाहेब गायकवाड यांचा मुलगा अमोल गायकवाड (वय-22) हा 12 मार्चपासून बेपत्ता आहे. शेजारील देवकर वस्तीवरील देविदास छगन देवकर याची 24 वर्षीय मुलगीही बेपत्ता आहे. अमोल यानेच आपल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय देवकर कुटुंबियांना आहे. त्यामुळे त्यांनी सूडभावनेतून ही हत्या केली आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.