ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
राष्ट्रवादीच्या मागणीला यश, फेरीवाल्यांना लवकरच मिळणार व्यवसाय प्रमाणपत्र
July 26, 2020 • JANATA xPRESS

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीमुळे फेरीवाल्यांना व्यवसाय प्रमाणपत्र मिळणार

नवी मुबंई

महाराष्ट्र राज्य नगरसंचालय विभाग तथा नवीमुबई महानगर पालिका याने संयुक्तपणे शहरातील 7326 पथविक्रेतेचा बायोमॅट्रीक सर्वेक्षण दोन वर्षापूर्वी करण्यात आला. मात्र अद्यापही नवीमुबई मनपा प्रशासने फेरीवालाना व्यवसाय प्रमाणपत्र दिले नाही.  याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवीमुबई ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोकण प्रभारी राज राजापूरकर यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर आयुक्त अभिजित बांगर यांनी नवीमुबई शहरातील बायोमॅट्रीक सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांना एक महीनाच्या आत व्यावसाय प्रमाण पञ वाटप करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असल्याचे माहीती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.
कोरोना काळात काम करणाऱ्या कायम व कंत्रांटी कामगार. ठोक मानधनावरील कामगारांना एक सारखाच न्याय देण्यासाठी केन्द्र शासनाच्या नियम व अटी पाहुन पन्नास लाख रुपये विमा कवच दिला जाईल. कंत्राटी कामगाराच्या घरकुल योजना बाबत निणॅय घेण्यात येईल .नाका कामगारासाठी निवारा शेड तसेच रिक्षा स्टॅन्ड वाढ करण्यासाठी विभाग अधिकारीऱ्यांकडून आढावा घेऊन निणॅय घेण्यात येईल. असे आश्र्वासन आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवीमुबई ओबीसी सेलच्या शिष्टमंडळाला दिले.
हयावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव सलीम बेग. ओबीसी सेल नवीमुबईचे जिल्हा अध्यक्ष रूपेश ठाकुर. तुर्भे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे देशमुख. ओबीसी सेल नवीमुबई बेलापुर विधानसभा अध्यक्ष दिनेश ठाकुर कार्यॅअध्यक्ष कल्पना भालेराव. तालुका सरचिटणीस योगेश गोरे . शिवाजी पाटील. तुर्भे तालुका अध्यक्षा प्रियकां ताई गायकवाड. उपाध्यक्ष शिवाजी शिंदे. वाडॅ अध्यक्ष जहागिर शेख आदी उपस्थित होते.