ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
लॉकडाऊन दरम्यान भारतीयांना त्यांचे पैसे घरपोच मिळण्यासाठी मोफत ‘सीएमएस कॅश टू होम’ सेवा
April 16, 2020 • प्रजासत्ताक जनता

लॉकडाऊन दरम्यान भारतीयांना त्यांचे पैसे घरपोच मिळण्यासाठी

सीएमएस इन्फो सिस्टमच्या मोफत ‘सीएमएस कॅश टू होम’ सेवेची घोषणा

या सेवेमुळे भारतातील जेष्ठ नागरीक आणि अपंग लोकांपर्यंत त्यांचे पैसे सुरक्षित पोहोचविले जाऊ शकतात

मुंबई

आपात्कालिन परिस्थितीत परिस्थितीशी दोन हात करताना काही विशेष निर्णय घेतले जातात. कोरोना या जागतिक संसंर्गजन्य जीवघेण्या संकटापासून वाचण्यासाठी भारत सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन अनुभवत आहे. यादरम्यान काही सेवा मिळविण्यासाठी लोकांना खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे. भारतातील सर्वांत मोठी कॅश आणि पेमेंट्स सोल्यूशन्स कंपनी सीएमएस इन्फो सिस्टम एक नवी आणि अगदी आपल्या दारात सेवा देणारी मोफत कॅश डिलिव्हरी सेवा देत आहे. ‘कॅश टू होम’ असे या सेवेचे नावा आहे. या सेवेमुळे जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना पैशांसाठी घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही. त्यांचे पैसे सुरक्षितरित्या त्यांच्यापर्यंत या सेवेद्वारे पोहोचविले जाणार आहेत.

जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना त्यांच्या घरी ‘कॅश  टू होम’ सेवेद्वारे पैसे मोफत पोहोचविण्याची सुविधा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार दिली जाईल. गेल्याच वर्षी या सेवेसोबत जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना जोडले गेले. ३१ मार्च २०२० मध्ये निर्देशित केल्या गेलेल्या अध्यादेशात यास पुन्हा अधोरेखित केले गेले. हे लॉकडाऊन अशा परिस्थितीत लागू केले गेले जेव्हा लोकांना आपला पगार आणि पेन्शन घेण्याची गरज पडते. याचवेळी सरकार डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरचे पैसे योग्य त्या व्यक्तीच्या खात्यात जमा करते. त्यामुळेच ही सेवा सहाय्यभूत ठरु शकते. 

सीएमएस इन्फो सिस्टमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी उपाध्यक्ष राजीव कौल म्हणाले कि, “या वेळेस समाजातील दुर्बल घटकांची सुरक्षा केली पाहिजे. ही सेवा सुरु करण्याची आत्यंतिक गरज आम्हांला जाणवली. संकट काळात लोकांपर्यंत त्यांचे पैसे सुरक्षित पोहोचविणे हे आमचे उद्दीष्ट्य आहे. आपण  सगळेच आपल्या कुटुंबाचं आरोग्य विशेषत: आपले पालक आणि घरातील जेष्ट व्यक्तिंच्या आरोग्याविषयी चिंतीत आहोत. त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू व सेवा पोहोचविणे आपली जबाबदारी आहे.  त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचवून त्यांना मानसिकदृष्ट्या सुरक्षित केले जाऊ शकते. आम्ही आमचे २० हजार कर्मचारी आणि अन्य सहकारी यांच्या सक्षम सकार्यामुळे ही सेवा देऊ शकतो. आमचे कर्मचारी आणि सहकारी ही सेवा २४ तास देण्यास तत्पर आहेत. जास्तीत जास्त लोकांना ही सेवा देता यावी म्हणून आम्ही अधिकाधिक बॅंकिंग पार्टनर्सना सोबत जोडत आहोत. सीएमएस ‘कॅश टू होम’ सुविधा सुरु करण्याची हीच योग्य वेळ आहे. याचवेळी नागरिकांना आपली बिले भागविण्यासाठी पैशांची गरज भासते. याच दरम्यान लोक आपला महिन्याच्या पगारातून बिले भरतात.

 सर्वांत महत्वपूर्ण म्हणजे जेष्ठ नागरिकांना सद्यकाळात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून बाहेर निघणं अवघड असताना त्यांच्या पर्यंत सुरक्षित ती खबरदारी घेऊन पैसे पोहोचविले जाऊ शकते. २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात सीएमएस एटीएम फाईंडर ऍप सीएमएसने तयार केला होता. यामुळे कोणत्या बॅंकेत पैसे आहेत हे नागरिकांना कळण्याची सुविधा होती. ‘कॅश टू होम सर्विस’चा लाभ घेण्याकरिता पार्टनर बॅंकांची यादी पाहण्याकरिता ग्राहक https://www.cms.com/ या संकेतस्थळास भेट देऊ शकतात. सुरुवातीस सर्व राज्यांतील ५० ठिकाणी सीएमएस या सुविधेचे अनावरण करणार आहे. लवकरच १२५ हून अधिक ठिकाणी याचा विस्तार केला जाईल. डिस्टा या एआय एनेबल्ड लोकेशन इंटेलिजन्सच्या मंचाचा वापर करुन सुरक्षितरित्या ही सुविधा पुरवली जाणार आहे.   सीएमएसला विश्वास आहे की ५ लाख नागरिक या सेवेचा लाभ घेतील. या सेवेच्या माध्यमातून सरासरी १० हजार रुपयांचे ते व्यवहार करु शकतात. या सेवेमुळे एकूण ५०० कोटी रुपयांचे वितरण केले जाईल. ज्यामुळे लोकांना त्यांचे पैसे गरजेच्या वेळी मिळेल.

 

सीएमएस इन्फो सिस्टम विषयी थोडक्यात-

सीएमएस इन्फो सिस्टम्स लिमिटेड (सीएमएस) ही भारताची प्रमुख व्यवस्थापन आणि पेमेण्ट सोल्यूशन कंपनी आहे. रोख रक्कमेच्या प्रक्रियेसोबत त्याच्या ने-आण करण्याची जबाबदारी देखील ही कंपनी सांभाळते. ही कंपनी कार्ड, एटीएम नेटवर्क, रिटेल मॅनेजमेंट आणि अन्य सेवेचे व्यवस्थापन करते. सीएमएस १ लाख १५ हजार एटीएम आणि रिटेल पॉईंट्स साठी पैसे फोचविणे आणि त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळते. सीएमएस कॉम्प्युटर्स मध्ये ब्लॅकस्टोन समूहाने अधिकांश गुंतवणूक केल्यानंतर २००९ मध्ये ही कंपनी आकारास आली. २०१५ मध्ये आशिया खंडातील सर्वांत मोठया पीई फर्म असलेल्या बेरिंग पीई आशियाने १०० टक्के भागीदारी मिळवली होती.