ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
वसई, नालासोपारा व विरारच्या कांही भागाचा वीजपुरवठा बाधित
February 3, 2020 • प्रजासत्ताक जनता

महापारेषणच्या नालासोपारा येथील अतिउच्चदाब उपकेंद्रातील १०० एमव्हीए रोहित्रात बिघाड
वसई, नालासोपारा व विरारच्या कांही भागाचा वीजपुरवठा बाधित


वसई: महापारेषण कंपनीच्या नालासोपारा पूर्व येथील धानीवबाग २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्रामध्ये सोमवारी (०३ फेब्रुवारी) पहाटे अडीचच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे या रोहित्रावरील वीज ग्राहकांचा  वीजभार इतर दोन रोहित्रांवर फिरविण्यात आला असून वसई, विरार व नालासोपारा येथील कांही भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस वीजपुरवठा गरजेनुसार आळीपाळीने बंद ठेवावा लागणार आहे. संबंधित भागातील सन्माननीय वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 
वीजपुरवठा बंद ठेवण्याचा कालावधी व विभाग पुढीलप्रमाणे आहे:- २२०/२२ केव्ही नालासोपारा उपकेंद्रांतर्गत तुळींज, विजयनगर, रहमतनगर, नगिनदास, बिलालपाडा भागात सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळात जवळपास ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. संतोष भुवन, वलईपाडा, बावशेत, तांडोपा, गौराईपाडा भागातील सुमारे ४५ हजार ग्राहकांची वीज सकाळी आठ ते साडेदहा दरम्यान बंद असेल. नालासोपारा पश्चिम परिसरातील प्रगतीनगर, महेश पार्क भागातील अंदाजे १७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी नऊ ते साडेअकरापर्यंत बंद राहील. २२/२२ केव्ही नारींगी उपकेंद्रांतर्गत विरार पूर्वमधील साईनाथनगर, जीवदानी रोड, आशा तसेच विहार इंडस्ट्रीज, गोपचार भागातील जवळपास ३४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी साडेबारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. विरार पश्चिममधील तारांगण, फुलपाडा रोड, सहकार नगर परिसरातील सुमारे ३३ हजार ग्राहकांची वीज दुपारी दोन ते चार दरम्यान बंद राहील. २२/२२ केव्ही पारोळ उपकेंद्रांतर्गत खानिवडे, सकवार, चांदीप, पारोळ, वज्रेश्वरी, गणेशपुरी भागातील अंदाजे साडेदहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी चार ते साडेसहा दरम्यान बंद असेल. 
२२/२२ केव्ही नाईकपाडा उपकेंद्रांतर्गत तुंगारेश्वर रोड, नाईकपाडा, रेमी परिसरातील नऊ हजार ग्राहकांची वीज सायंकाळी साडेसहा ते साडेसातपर्यंत बंद असेल. शिवभीम नगर, सातिवली नाका, बजरंग ढाबा ते सातिवली हायवे भागातील सुमारे ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी साडेसात ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद असेल. २२/२२ केव्ही पोमण उपकेंद्रांतर्गत कामणगाव, पोमनगाव, देवतळ, केआयडीसी, डोंगरीपाडा, मोरी, नागले, शिलोत्तर भागात सुमारे सव्वाचार हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रात्री साडेआठ ते साडेनऊ दरम्यान बंद राहील. २२/२२ केव्ही शिरगाव उपकेंद्रांतर्गत वैतरणा, डोलीव, कोशिंबे, खर्डी भागात अंदाजे साडेसहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहील. आवश्यकतेनुसारच वीज बंद ठेवण्यात येणार असून सोमवारी रात्री बहुतांश ठिकाणी वीज बंद ठेवण्याची गरज भासली नव्हती. येत्या चार-पाच दिवसात दुरुस्ती होऊन परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून संबंधित परिसरातील वीज ग्राहकांना करण्यात येत आहे.