ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
विक्रमगड नगरपंचायत मुख्याधिकारी लाच घेतांना पोलिसांच्या जाळ्यात
June 15, 2020 • JANATA xPRESS

विक्रमगड नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी सी. के. पवार लाच घेतांना पोलिसांच्या जाळ्यात

पालघर

जिल्ह्यातील विक्रमगड नगरपंचायतचे शासन नियुक्त मुख्याधिकारी सी. के. पवार यांना ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक १४ जुन रोजी विक्रमगड नगरपंचायतच्या कार्यालयात रंगेहात पकडले आहे.  विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सी के पवार यांनी कंत्राटदाराकडून लाचेच्या पोटी स्वत:च्या फॉर्म हाऊस पर्यंत १८ फुटी रस्ता तयार करून घेतला. पक्का डांबरी रस्त्याचे निर्माणाधिन काम विनामोबदला करून घेतले. सदर कामाकरिता आजवर तीन लाख रुपये खर्च  झालेला आहे.

सी.के पवार पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार असून त्यांना काही दिवसांपूर्वी विक्रमगड नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं .पवार हे वादग्रस्त राहिले असून काही वर्षापूर्वी त्यांनी पालघर येथे हवेत गोळीबार सुद्धा केला होता.. पवार याच्याकडे  ३_३ विभागाचे अतिरिक्त चार्ज होते यांनी लालसेपोटी विक्रमगड नगर पंचायत येथे मुख्याधिकारी म्हणून चार्ज घेतला परंतु त्यांना फारसा काळ मुख्याधिकारी म्हणून पद निभावता आले नाही. रोड कॉन्स्ट्रकशन कंपनीचे काम सुरळीत चालू देण्यासाठी व कंपनीच्या बांधकाम साहित्य वाहतुकीचे वाहनांवर कोणतीही कारवाई न करणे या आरोपाखाली  लाचलुचपत विभागाचे पोलिस उप निरीक्षक चंद्रशेखर दुबे पोलिस निरीक्षक विलास मते पोलिस नाईक सचिन मोरे तानाजी गायकवाड महिला पोलिस शिपाई राजपूत मॅडम हवालदार अहाडी श्रिभूषण यांच्या पथकाने कारवाई केली