ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
विजय सिंघल ठाणे महापालिकेचे नवे आयुक्त
March 19, 2020 • प्रजासत्ताक जनता

मुंबई :

ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आणखी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यामध्ये ठाणे महापालिका आयुक्त सिंघल आणि  नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(1) श्री रणजित कुमार यांची नियुक्ती संचालक, माहिती तंत्रज्ञान मुंबई या पदावर पदावर

(2) श्री एमजी अर्दड यांची नियुक्ती आयुक्त, मृद व जलसंधारण औरंगाबाद या रिक्त पदावर

(3) श्री विजय सिंघल यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे या पदावर

(4) श्री एल. एस. माळी यांची नियुक्ती उपसचिव, ग्रामविकास विभाग, मुंबई या रिक्त पदावर

(5) श्री. अभिजीत बांगर यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करून त्यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर या रिक्त पदावर

(6) श्री. यु. ए. जाधव यांच्या आदेशामध्ये अंशतः बदल करून त्यांची नियुक्ती उपसचिव, ग्रामविकास विभाग मुंबई या रिक्त पदावर

(7) श्री मदन नागरगोजे संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई, यांची नियुक्ती सहसचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई या रिक्त पदावर

अशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत