ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
शहापूर तालुक्यातील वासिंद-कीन्हवली रस्त्याची दूरूस्ती, बांधकाम विभागाने घेतली दखल
September 15, 2020 • JANATA xPRESS
शहापूर तालुक्यातील वासिंद-कीन्हवली रस्ता चकाचक 
 
शहापूर
शहापुर तालूक्यातील वासिंद-शेरे-शेद्रूण-अल्याणी-गेगांव- कीन्हवली रस्ता (प्र.जि.मा.६२) रस्ता अरुंद व वळनाचा असल्यामुळे तसेच पावसाळ्यात गवत वाढल्याने व झाडामुळे रस्ता व्यवस्थित दिसत नसल्याने रस्त्यावर अपघात होत होते. याची दखल घेत भारतीय जनता जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सतिश सापळे यांनी याबाबत शहापूर  उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग  अ नि जाधव यांना लेखी निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत
प्रेम बोटकोंडले, केशव भाकरे, गणेश वाळींबे आदी उपस्थित होते.  गवत काढण्याची व रस्त्यावर येणारी झाडे छाटण्याची मागणी याद्वारे करण्यात आली होती. सदर मागणीची तत्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता जाधव तसेच शाखा अभियंता बच्छाव यांनी रस्त्यावर आलेली झाडे व गवत काढन्याच्या कामाला सूरवात केली आहे.